तू आलीस तेंव्हा (कवी-कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, March 29, 2012, 04:20:01 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore


तू आलीस तेंव्हा


तू आलीस तेंव्हा
पाऊस पडत होता
निसर्गही जणू तुझ्या येण्याचे
स्वागत करत होता


तुझा अबोला चेहरा
त्या वाऱ्यासंगे बोलत होता
माझ्या मनाला दुरूनच का होईना
ओला करत होता


ते भिजलेले केस तुझे
माझ्या मनासारखे विस्कटलेले होते
आतुरलेले डोळे जणू
मलाच निहाळत होते


पण तू माझ्या मागे
उभ्या माझ्या आईला पाहत होतीस
गोड स्मित देऊन जणू
मला प्रेमाची कबुली देत होतीस


अचानक भरड्या आवाजात तुला
हाक कोणी मारली
बापूस तुझा आणि कोण
ज्याने माझ्या स्वप्नांची वाट लावली


पण काहीही म्हण मी माझा नसतोच 
तू पाहतेस मला जेंव्हा
आणि निसर्गासोबत मी हि भारावलो
तू आलीस तेंव्हा........!


कवी - कल्पेश देवरे