माझी गाणी : चंदेरी रात

Started by prasad26, March 29, 2012, 04:55:59 PM

Previous topic - Next topic

prasad26

चंदेरी रात

तो: चंदेरी रात प्रिये तुझी साथ
      प्रीतीची ग बरसात साजणी
      प्रीतीची ग बरसात
ती: चंदेरी रात प्रिया तुझी साथ
      प्रीतीची रे  बरसात साजणा
      प्रीतीची रे  बरसात

तो: चांदाच्या किरणावारी झुलव शृंगाराचा तू झुला
ती: स्वच्छंदी भ्रमरापरी फुलव हलके हलके तू मला
     घेशी चुंबने अगणित जितक्या चांदण्या रे गगनात
      सखया प्रीतीची रे बरसात

तो: डोंगर कपारीत वाहती खळखळ प्रणयाचे झरे
ती: नाद हा जरी एकांती होई मन माझे रे लाजरे
      झुकती खाली पापण्या धरता मधुघट तू अधरात
      सखया प्रीतीची रे बरसात

ती:  बाहुपाशात तुझ्या तनुवरी रोमांचाची नर्तने
       नाचे यौवन मयुरी होती मिलनाची आवर्तने
तो: अशीच रजनी बहरेल जोवरी तृप्ती दिसे नयनात
      सखये प्रीतीची ग बरसात


---प्रसाद शुक्ल

केदार मेहेंदळे