स्व-सन्मान

Started by शिवाजी सांगळे, May 01, 2026, 03:55:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्व-सन्मान

आज करतोय कामगार दिन साजरा
प्रत्यक्षात आहे कामगार दीन बिचारा,
अतिशयोक्तीपुर्ण काही नाही सांगत
खात्री करण्या कामगारानांच विचारा !

व्यवसाय सारे, मंदावल्यात नोकऱ्या
त्यातच सर्वत्र बेरोजगारी फोफावली,
तुटपुंज्या, सकल व्यवस्थेची इथल्या
हि प्रातिनिधीक कैफियत हो मांडली !

आधार कष्टकरी, कामकरी, शेतकरी
तारणहार अवघ्या साऱ्या या जगाचा,
थोडा तरी दृष्टिकोन बदलायला हवा
त्यांनाही आहे हक्क, स्व-सन्मानाचा !

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९