माझी गाणी: माझ्या मनातील माझी कविता

Started by prasad26, March 30, 2012, 10:31:20 AM

Previous topic - Next topic

prasad26

माझ्या मनातील माझी कविता

जेंव्हा आमचे कवी-मित्र केदार मेहंदळे ह्यांनी माझ्या एका कवितेवर टिप्पणी केली त्याला उत्तर देताना खालील भावना मी व्यक्त केल्या


मनातील तरंग जेंव्हा शब्दात येतात
शब्द जेंव्हा छन्दोबद्ध होतात
तिथेच कविता होते  साकार
अन कागदावर घेते आकार

काही कवितांचा जन्म कल्पनेतून होतो
काही कविता आपण अनुभवलेल्या असतो
तो अनुभव स्वतःचा असेल वा भोवतालचा
असेल उद्याचा किंवा आजचा वा तो कालचा

काही कविता आपण जगलेल्या असतो
जगण्यातून कविता सुचते
कवितेतून जगणे रुचते
आणि अशी जगलेली कविता
नेहमीच मनात घर करून राहते

----प्रसाद शुक्ल

केदार मेहेंदळे

काही कविता आपण जगलेल्या असतो
जगण्यातून कविता सुचते
कवितेतून जगणे रुचते
आणि अशी जगलेली कविता
नेहमीच मनात घर करून राहते



khup chan...

raghav.shastri

Chan... Surekh kavita...
Shvatche Kadave tar Khupach Mast...

काही कविता आपण जगलेल्या असतो
जगण्यातून कविता सुचते
कवितेतून जगणे रुचते
आणि अशी जगलेली कविता
नेहमीच मनात घर करून राहते

Pahilya kadvyatali Dusari line thodi change karavi asa mala vatate....

मनातील तरंग जेंव्हा शब्दात येतात
शब्द जेंव्हा बोलके होतात
तिथेच कविता होते  साकार
अन कागदावर घेते आकार....