ती गेली अन् (कवी - कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, March 30, 2012, 02:04:07 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore


ती गेली अन्


ती गेली अन्
मी माझाच न राहिलो
एकांतात बसून स्वतःशी
नेहमीच बडबडत राहिलो


ती आस तिच्या येण्याची
मनाला फार भेडसावत आहे 
डोळ्यापुढे तीच असावी
माझी हीच एक इच्छा आहे 


दोघांनी पाहिलेले स्वप्नं
मला सतत आठवत आहे
तिचे ते नाजूक शब्द
आजही कानी गुंगत आहे 


रित्या हातामध्ये माझ्या
तिचे हात मी पाहत आहे
अन् रोज संध्याकाळी मी
तिच्यासंगे फिरत आहे


हे स्वप्नं जरी असले माझे
मी स्वप्नातच फार खुश आहे
ती देवा घरी जरी गेली असली
तरी ती माझ्या जवळ आहे


कवी - कल्पेश देवरे 





vishal zarkande


Superb


ती गेली अन्


ती गेली अन्
मी माझाच न राहिलो
एकांतात बसून स्वतःशी
नेहमीच बडबडत राहिलो


ती आस तिच्या येण्याची
मनाला फार भेडसावत आहे 
डोळ्यापुढे तीच असावी
माझी हीच एक इच्छा आहे 


दोघांनी पाहिलेले स्वप्नं
मला सतत आठवत आहे
तिचे ते नाजूक शब्द
आजही कानी गुंगत आहे 


रित्या हातामध्ये माझ्या
तिचे हात मी पाहत आहे
अन् रोज संध्याकाळी मी
तिच्यासंगे फिरत आहे


हे स्वप्नं जरी असले माझे
मी स्वप्नातच फार खुश आहे
ती देवा घरी जरी गेली असली
तरी ती माझ्या जवळ आहे


कवी - कल्पेश देवरे 



jyoti salunkhe



Kalpesh Deore