अनोळखेपण ..

Started by Rohit Dhage, March 31, 2012, 05:52:32 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

हेच हवं होतं ना तुला..
झालंय ना आता मनासारखं..
आता अजून काय हवंय..
तुला काय पाहिजे ना,
हेच मुळी समजलं नाही तुला..
अंधारात राहिलीस कायम..
आणि मलाही ठेवलंस.., उजेडाची स्वप्ने दाखवून...
आणि आज.. आज लक्ख प्रकाश पडलाय..
नव्हे पाडलाय.. तूच.. तुझ्या नकळत..
तुला नकोसा वाटलेला..
आमिषं दाखवलीस मग.. परत येण्यासाठी..
तुझी परत येण्याची..
पण आता.. आता मनाने ताबा घेतलाय..
आज काळीजही त्याची चूक कबूल करतंय..
आज मी तुला पाहिजे तसाच आहे..
आज.. आज मी तुला तुझा वाटत नाही ..
तू कालही संभ्रमित होतीस..
तू आजही संभ्रमित आहेस..
काल जो झाला तो तुझा स्वार्थ होता..
आज आहे ते फक्त अनोळखेपण..
पण मी विसरणार नाही..,
एक नवीन ओळख दाखवून देईल तुला..
आज मी काही नवीन भासेल तुला..
पण.. पण गेले पैलू जे खरे होते..
मागूनही ते उद्या नसतील..
उद्या असेल ते फक्त मृगजळ..
तुझ्या माझ्यातील ओलाव्याचे..,
फक्त मृगजळ...

- रोहित