कोणीतरी आपलं असावं

Started by प्रशांत नागरगोजे, April 01, 2012, 11:08:27 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

चालता-चालता लागली ठेच
दगड सारण्यासाठी
कोणीतरी आपलं असावं

अश्रू दुखाचे अन आनंदाचे
देण्यास अन घेण्यास
कोणीतरी आपलं असावं

हृदयाच्या पाकळ्या कोमेजताना
फुलविण्यास त्या पुन्हा
कोणीतरी आपलं असावं

जीवनातील निराशेला
न दुखावता हसवणार
कोणीतरी आपलं असावं

कच्चे धागे प्रेमाचे
हळुवार जपणार
कोणीतरी आपलं असावं.

*** प्रशांत नागरगोजे***
दिनांक: १९-१०-२००६ 



smit natekar

मृगजळ - एक नसलेले अस्तीत्व >;(
.
.