सृष्टी धुक्याची.... नवलाईची ("निसर्गकविता")

Started by shashaank, April 02, 2012, 09:26:33 AM

Previous topic - Next topic

shashaank

सृष्टी धुक्याची....
.....नवलाईची....


-shashaank purandare

सृष्टी धुक्याची....
नवलाईची
थेंब ढगांची
जरतारीची
मंद्र गतीची
द्रुत लयीची
अति सुखाची
मृदु स्पर्शाची


छाया वैभव उकलण्याची
अवगुंठनी मिरवण्याची
दिसे ना दिसे जादूगिरीची
गूढ गूढ तरी हवीहवीशी
शब्दी कधी ना गवसायाची
अनुभवण्याची नवलाईची
सृष्टी धुक्याची.....



http://




केदार मेहेंदळे



केदार मेहेंदळे