सूटलेला हात आज तू पाहू नको

Started by jyoti salunkhe, April 03, 2012, 02:56:16 PM

Previous topic - Next topic

jyoti salunkhe

सूटलेला हात आज तू पाहू नको
नवीन सकाळ बाहेर झाली आहे
गेलेली रात्र विसरुनी जा, बग
नवीन पहाट झाली आहे
तू सोडूनी दे  कात पूर्व जन्माची, बग
नवीन आयुष्याची  सुरुवात  झाली  आहे
सोडूनी सर्व दुख यातना,  बग
नवीन सुखाची योजना झाली  आहे
डोळ्यातुनी जरी वहिल्या नदया तरीही , बग
आज हृदयाच्या  समुद्रात  शांतता  झाली आहे   
सूटलेला हात आज तू पाहू नको
नवीन सकाळ बाहेर झाली आहे

.............ज्योती साळुंखे



#3

बघ कधी हात  पकडून  हा हात
कधीच  सैल पडणार नाही


ये कधी झोपडीत माझ्या  तुला 
राजवाड्याची ही आवड राहणार नाही


तू फक्त  माझीच  हो 
दुसर्याची झालीस
तर मी  जगणार नाही   
-
© प्रशांत शिंदे


खूप  सुंदर  ज्योती ......