सांज कोवळी रडली

Started by muktibodh, April 08, 2012, 04:03:45 PM

Previous topic - Next topic

muktibodh

त्या दूर नदीच्या काठी
आकाशी घुमतो वारा,
मेघांच्या श्वासांमधुनी,
टपटपती पाउसधारा!

अंधार कोसळे वरुनी,
मातीत उमटली नक्षी,
क्षितीजाच्या मलिन किनारी,
ती सांज कोवळी रडली !

संध्येच्या अश्रुंमधुनी,
रक्ताचे ओघळ सुटले
तलवारीच्या पात्या वरती
शीर कुणाचे रडते?

कुणी कुणाचे दोषी नव्हते,
तरी हादरे धरती
पोलादाच्या टापांखाली,
श्वास कोवळे पिचती!

प्रदीप मुक्तिबोध




केदार मेहेंदळे

khup chan kavita.... sundar shbd ani upma.... khup chan




suryakant


त्या दूर नदीच्या काठी
आकाशी घुमतो वारा,
मेघांच्या श्वासांमधुनी,
टपटपती पाउसधारा!

अंधार कोसळे वरुनी,
मातीत उमटली नक्षी,
क्षितीजाच्या मलिन किनारी,
ती सांज कोवळी रडली !

संध्येच्या अश्रुंमधुनी,
रक्ताचे ओघळ सुटले
तलवारीच्या पात्या वरती
शीर कुणाचे रडते?

कुणी कुणाचे दोषी नव्हते,
तरी हादरे धरती
पोलादाच्या टापांखाली,
श्वास कोवळे पिचती!

प्रदीप मुक्तिबोध

asmita!!

kharach re khup khup radli....ekdum sundar lihitos