तुझ्या आठवणीत..

Started by Ajinkyashinde, April 09, 2012, 04:29:48 PM

Previous topic - Next topic

Ajinkyashinde

मनात तुझ्या नसतानाही मागे वळुन पाहशील का?

तुझ्याचसाठी थांबलो इथे दोन शब्द बोलशील का?

पाहून पाहून दमलो, वाट माझी तु पाहशील का?
कोँडल्या भावना वाट मला दाखवशील का?

स्वप्न पाही मन माझं तुझही असं होत का?

गर्दीत खुप एकटं वाटतं तुलाही अस होत का?
दूर जाताना मी पाठून हाक मला देशील का?

मनात तुझ्या नसतानाही मला कबुल तु करशील का?
कदाचित नसेन मी उद्या आठवण माझी काढशील का?..

आठवण माझी काढशील का?..

केदार मेहेंदळे