जीवनाचे महत्व

Started by prasad.anandrao, April 10, 2012, 09:27:17 AM

Previous topic - Next topic

prasad.anandrao

खरच कधी कधी स्वतःवर फार हसाव वाटत,
भुतकाळातील चुकांचे शल्य वर्तमानात अनेकदा टोचत असत.

असे असले तरी सर्व गोष्टी काही वेदना देणाय्रा नसतात,
दुःखावर फुकंर घालणारे काही क्षण मनात प्रत्येकाने दडवलेले असतात.

आपल्या जीवनाचे मोल आपल्याला काहीच माहित नसत,
तुम्ही मी आपण काय? सर्वजणांचे जीवन देवाच्या हातातलं एक बाहुल असत.

शेवटी जीवनाचे समीकरण मांडताना सुख दुःखांची शिदोरीच उपयोगी येते,
ती जर व्यवस्थीत मांडली नाही तर जीवनाचे गणित चुकतेच चुकते. 

केदार मेहेंदळे