तिला माझ्याकडून कविता हवी होती ...

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 10, 2012, 11:29:16 AM

Previous topic - Next topic

तिला  माझ्या  कविता खूप आवडायच्या 
कुणाच्या    नसोत  पण
तिच्या कमेंट्स  अगोदर असायच्या ....

मी  एक  दु:ख कवी
दु:खीच कविता करायचो

तिला  माझ्याकडून   तिच्यावर
कविता  हवी होती
शब्दच  सुचत नव्हते   मी काय तिच्यावर लिहावे
प्रश्न  वेड्या मनाला  पडला होता
तिला  हि तू रडक्याच  शब्दांत  मांडणार..??

तीच  माझी  होती प्रेक्षक  पहिली
तिच्यामुळेच  तर  कवितेत  गोडी  यायची
लिहायचे  तरी काय
मला  समजतच नव्हते
शब्द  कोणते   जे हसू  ओठांवरी आणतील
ते  शब्दच  मिळत  नव्हते
लिहले  मी   ते पुढे  आले मग  ओठी ....

तू  असताना  कुणी नकोसे  वाटतं
तू  बोलताना माझे मन  जाग्यावरच   न थांबतं
नाजूक  अन  गोड  तुझ्या आवाजाने 
माझे मन  आकाशी  उंच  उडू  लागतं

हसतेस  जेव्हा तू  सूर तालांनी  गीत  चालते
मन  माझे  त्यात  डुलू लागतं
तुझ्या माझ्या मैत्रीत जरा  गुपितच आहे
लांब   जरी  आहोत   तरी
आमच्यात  ओढ  भेटीची  आहे

थोडा  वेळ  कधी   न बोलता  राहू शकत नव्हतो
एकमेकांना   त्याचा  जाब  विचारायचो
आपली हि  मैत्री अशीच  निरंतर रहावी

झाली बघ  कविता  हि  फक्त  तुज  जवळ  पोहचावी
प्रतिक्रिया  तुझी  ती  येऊ  दे  लवकरच
मैत्री आपुली  आज भेट  घडून  यावी

पाहतोय  मी  वाट   तू   हसतच    जवळ यावी
मैत्री  हि आपुली  ह्या  कवितेनेच मांडावी
मैत्री  आपली ह्या  शब्दांनीच सांगावी......

हि  कविता माझी
बघ  तुज  साठीच आहे ....
© प्रशांत शिंदे


Deepak Pardhe


Mr. Prashant ,

आपली कविता वाचली, छान आहे... पण योगायोग म्हणावा की काय,
मी जी काल कविता लिहली आहे "माझी अशी ती मैत्रिण"  तिच्या बरोबर अगदी जूळते आहे,

आपणास वाईट वाटणार नसेल तर विचारतो, आपण ही कविता लिहताना माझ्या कवितेचा संदर्भ घेतला होता काय ?

- दीपक पारधे

प्रशांत शिंदे

माफी मागतो   पण  मी  कालच  मराठी कवितेवर  रजिस्टर झालो  आणि  माझ्या कविते मध्ये  अश्याच  शब्दांचा  उल्लेख मी  नेहमी करतो  कारण मी  ते अनुभवतो आहे    ... आणि  अजून मी   मराठी कविता हि वेब साईट   कसे   वापरायचे ते   नित  समजू  शकलो  हि नाही ...  तर  तुमच्या  कवितेशी  मिळती जुळती म्हणत असाल  तर  हे  योगायोग  म्हणता  येईल .....
पण  माझ्या कविता  तुम्ही  पाहू शकता   माझ्या कविता  ह्या  कुणाकडून   चोरलेल्या  नसतात ...  आणि  माझ्या ह्या  कवितेने  तुम्हास  त्रास  झाला  असेल    तर  मी    स्वत :  माफी मागतो ....   पण   मला  माहित नाही  तुमची कविता आणि माझी  कविता खरच मिळते आहे     का?....

-
प्रशांत शिंदे


santoshi.world

@ Mr. Prashant & Deepak Pardhe (http://marathikavita.co.in/index.php/topic,8129.msg26305.html#msg26305) ... mala hi donhi kavita tashya same same vatalya .............. tumchi hi maitrin ekach tar nahi na ;) .... mhanun doghana at a time same kavita suchlya :D


@ Mr. Prashant & Deepak Pardhe (http://marathikavita.co.in/index.php/topic,8129.msg26305.html#msg26305) ... mala hi donhi kavita tashya same same vatalya .............. tumchi hi maitrin ekach tar nahi na ;) .... mhanun doghana at a time same kavita suchlya :D
hahahaa........  nice  joke

Deepak Pardhe


thik aahe Mr. Prashant,

mi kahi tumachyavar Aarop karat nahiye... asel ya Yogayog...

Tumache Swagatach aahe... marathi kavita ya vebsite var....

regards,

Deepak Pardhe

प्रशांत नागरगोजे

लई  भारी  लिहिलंय  प्रशांतराव ...... :)


लई  भारी  लिहिलंय  प्रशांतराव ...... :)
dhanyvad ...  prashant   nagargoje.......