मैफिल

Started by vidyakavita, April 10, 2012, 04:11:17 PM

Previous topic - Next topic

vidyakavita

            मैफिल
सजविल्यात मैफिली इथं प्रत्येकानं 
जणू पृथ्वीच्याच लडिवाळ आग्रहानं

        चिमुकली पावलंही शोधू लागतात नकळत
        स्वर जाणण्याचा जगण्याचा
        अन त्यातूनच जन्मतात गाणी
        लडीत  गुंफलेल्या मोत्यांसारखी

गाणं अस्तित्वाचं गाणं चैतन्याचं
स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या ओळखीचं
ध्रुव पदातले जात धर्म आळवून आळवून
पुन्हा पुन्हा गाण्याचं

        प्रत्येक शब्द व्यापलाय अनंततेने
        नवीन नाती          नवीन गाणी
        लोभस गाणी        प्रसन्न गाणी
        गाणी अश्रुनची      गाणी हास्यांची

कुणी गात असतो राग दुःखाच्या प्रहरांचा
तर कुणी सुखाच्या निळ्या शांत क्षणांचा

     सारं काही चाललय मैफिल रंगण्यासाठी
     आभाळातल्या देवा तुझी कलात्मकता तर बहुश्रुतच
     आमचं इथ असणं ही त्यातला एक भागच

याच मैफिलीत भैरवीही गाईन एक दिवस
आवाजातली कंपनं मात्र सहन कर
चुकलं  भागलं माफ कर
रसिक माय बापा कधी तरी टाळयांचा नाद कर

     माझं गाणं थांबलं तरी मैफिली झडतच रहातील
     एकाच मंचावर अनेक गळे असेच गात रहातील
     वेगवेगळ्या भाषेतले शब्दही वेगळे असतील
     हृदय मात्र उत्कटतेने गाणं एकच गाईल

सारं काही तुझ्यासाठी
       रसिका तुझ्याच साठी
       रसिका तुझ्याच साठी ..............            
                     

                             by vidya anand  

shashaank


केदार मेहेंदळे