वाट

Started by प्रशांत नागरगोजे, April 10, 2012, 11:36:31 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

   वाट
वाट कधी चुकतच नाही
पावलंच आपली दिशा बदलतात
मग सर्व माहित असूनही
वाटेलाच, बालट अर्थ लावतात.

असते आपली तिथेच वाट
पाउल येण्याआधी, पाउल गेल्यानंतर
दिसते कधी स्पष्ट, कधी अस्पष्ट
उमजत हे, थोडं अंतर चालल्यानंतर.

वाट असते, कधी काट्याची
कधी सजवलेल्या सुगंधी फुलाची
असतो मग प्रश्न, ज्याचात्याचा
कुठवर चालायचा, अन कुठे थांबायचं.   

 

visit me at www.prashu-mypoems.blogspot.com

raghav.shastri

Chan.... sundar kavita.... dusare kadace tar apratim....

केदार मेहेंदळे

khupach chan kavita....

प्रशांत नागरगोजे

धन्यवाद केदार सर आणि राघव शास्त्री. :)