अजून कुठेतरी

Started by genius_pankaj, April 11, 2012, 01:12:48 AM

Previous topic - Next topic

genius_pankaj

अजून कुठेतरी जळते मिणमिणती वात
अजून कुठेतरी उंबरठ्यावर रेंगाळते रात
अजून कुठेतरी नयनांचे चातक
त्या चेहऱ्याच्या शोधात

अजून कुठेतरी जाणवतो तो नाजूक स्पर्श
अजून कुठेतरी दरवळतो तो निरागस हर्ष
अजून कुठेतरी त्या प्रतिमेचा उत्कर्ष
कुणाच्यातरी दर्पणात

अजून कुठेतरी किणकिणतात ते घुंगरू
अजून कुठेतरी शब्दवेडे ते अधरू
अजून कुठेतरी होतसे साकारू
ते चित्र कुणा कुंचल्यात

अजून कुठेतरी तरुतळी ती एक व्यक्ती
अजून कुठेतरी भोवताली फिरे ती आसक्ती
अजून कुठेतरी त्या आसक्तीची भक्ती
दडलेली एखाद्या हृदयात

अजून कुठेतरी माळरानी घुमतो तो नाद
अजून कुठेतरी एक आवाज घाली साद
अजून कुठेतरी मनाचा मनाशीच वाद
अडकून भल्याबुऱ्याच्या गहनांत

अजून कुठेतरी संपताना आयुष्याची तडजोड
अजून कुठेतरी लागलेली अनंताची ओढ
अजून कुठेतरी समाधी स्वप्न गोड
फुलताना कुण्या अंतरंगात ....................

genius_pankaj

shashaank

vaa khoopach sundar - aavadaleech agadee.....

prasad26

mast  --khup chan
kavita khup awadali

केदार मेहेंदळे


aspradhan

   Very touching. Kahi tari hurhur manala lavanari Kavita!! very nice!!



मिलिंद कुंभारे

अजून कुठेतरी जळते मिणमिणती वात
अजून कुठेतरी उंबरठ्यावर रेंगाळते रात

छान आहे कविता! :) :) :)