मला सारेच सोडून जातील..(प्रशांत शिंदे )

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 11, 2012, 01:46:38 PM

Previous topic - Next topic

एक एक करत
उद्या सारेच दूर होतील

ज्याला जवळ केले
उद्या सोडून मला जातील

फुलांसारखे जपलेले नाते हे

उद्या ते ही सुकून जाईल

पाकळी पाकळी सारखे
मला उद्या एकटे करून जाईल

नसेल उद्या सोबत कुणी

मग ....

जगणार मी कसा

खरे तर नजरेस
तुमच्या मी दिसणार नाही उद्या

सावली सारखे वागलो सोबत

आता ते ही मी काढणार

खरेच सांगतो मी तुला एकांता

असह्य होतात रे नात्यांच्या भावना

आता तर अश्रू ही
अपुरे पडतात ह्या डोळ्यांना ...

खरच मी पडतो रे एकटा
नाही कुणी माझे

कुणास ठावूक तिरडी वरही त्यांची

येतील कि नाही फुले

एक एक करून
मला सारेच सोडून जातील ....

जग हे सोडून मी निघून जाईल ....
-
© प्रशांत शिंदे

प्रशांत नागरगोजे

उद्याची चिंता करायची कशाला
उधळून द्या आज मनाला.
आहेत क्षण जीवनाचे मोजकेच
जगा आनंदित, भाग्य तितकेच .


उद्याची चिंता करायची कशाला
उधळून द्या आज मनाला.
आहेत क्षण जीवनाचे मोजकेच
जगा आनंदित, भाग्य तितकेच .
chan   prashuN

केदार मेहेंदळे


केदारजी जे मनात असतं तेच कवितेतून उतरत असतं..... मनच उदास असेल तर  अश्याच कविता येणार......