विरह ....!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 11, 2012, 03:32:26 PM

Previous topic - Next topic
तिच्यासाठी जगलो मी
तिच्यावर प्रेम केले मी

स्वत: पेक्षा जास्तच तिला जपले मी
एके दिवशी विचार आला
तिला सांगून टाकावे

प्रेम करतो मी हे तिला सांगूनच टाकावे
पण....
भीती वाटली ती रागावेल तर नाही ना
रागवली तरी चालेल
पण....
मला सोडेल तर नाही ना
तशी ती हि कुठेतरी
प्रेम माझ्यावर करायचीच
म्हणून तर रात्र रात्र ती ही जागायची
हिम्मत करून मी एकदा तिला विचारले
नकारात देऊन उत्तर तिने मला स्वीकारले
पण....
तिला घरची काळजी होती
समाजाच्या काळजीत
ती कुठे तरी पडत होती ....!!

काय म्हणेल हे जग
आपली जात आहे वेगळी
हा विचार तिला दूर सोबत न्यायचा

प्रेम तर जात आणि रूप पाहून नसतं
हे तिला समजलेच नाही

जातीच्या नावावर ती मला सोडत होती
तिला काय माहित
ती स्वत: लाच विसरत होती
प्रेम म्हणजे अबोल नाते असतं
ज्याचे शब्द न शब्द हे आपणच लिहित असतो ....!!

आता ती एकटीच असते
तिला मी कुठे आहे
त्याची विचारपूस करत असते
माझी आठवण काढून ती रडत असते
माझे ते प्रेम तिला उशिरा कळले
पण...
आता तर मी
वेगळी कडेच निघून गेलो होतो ....!!


तिच्या नकाराने मी हिरमुसलो होतो
सावरू शकत नव्हतो म्हणून
माझा शेवट करून गेलो होतो

एकच नाते हवे होते
म्हणून सगळी नाते मी तोडली
तिच्या साठी मी रक्ताची नाती ही सोडली होती....!!

आता मी तुला कधी मिळणार नाही
तुझी माझी जोडी आता
ह्या जन्मात तरी जुळणार नाही ....

रडू नकोस तू मी सोबतच तुझ्या राहील
रात्रीच्या चांदण्यात बसून मी
तुलाच बघत राहील....

अलविदा !! अलविदा ....!!

-
© प्रशांत शिंदे


प्रशांत नागरगोजे



really heart touching..... :(
dhnyvad bhava