तिचं माझं प्रेम....

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 12, 2012, 03:49:20 PM

Previous topic - Next topic
फूलांसारखी होती ती
काटयांसारखा मी

सारेच तिला तोडू पहायचे

ती काटयामागेच लपायची

कसलाच विचार न करता

काटा पूढे सरकायचा

सूगंध तो तिचा
असा काही दरवळायचा

मोहीत होऊन तो
तिचाच होऊन जायचा

एक दिवस फूल ते
काटयाशीच भांडलं

माझ्यासाठी नाहीस सांगून
एकटे त्यास पाडलं

जिच्यासाठी जगला तो
तिनेच डोळयांत पाणी आणलं

तूटला तो काटा

अन....

फूल ही ते वेगळे झाले

फूलास आपले मानता
आज एकटयातच रडले

सूगंधी ते फूल
अत्तर बनून जगलं

काटा होता तो
त्यास मातीतच गाडलं
-
© प्रशांत शिंदे
 

केदार मेहेंदळे