झाडांचं महत्त्व यांना कळणार कधी?

Started by प्रशांत नागरगोजे, April 13, 2012, 01:31:51 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

       काही दिवसांपूर्वी सांगली -मिरज रस्त्यावर विश्रामबाग येथे एक अपघात झाला. अपघातात सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
काही कामगारांनी वडाच्या झाडाच्या खोडाशी कचरा जाळला, त्यामुळे खोड आतून पूर्ण जळाले  आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक बस जात असताना बसवर कोसळले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मान्य आहे सहा जणांचा मृत्यू झाला पण यात त्या झाडाचा काय  दोष होता? झाड कोसळले होते म्हणून तोडण्याचा काही एक प्रश्न नव्हता, पण शेजारच्या झाडांची काय चुकी होती? मनपा ने या मार्गावरील विश्रामबागेतील पाच झाडांची कत्तल केली. एका वडाच्या झाडाची किंमत या सरकारला माहित नसावी. कीव  येते झाडांची कत्तल करणाऱ्या माणसांची.

       तरी लोकांना बुद्धी आली नाही. झाडाच्या खोडाशी आग लावण चालूच होत. कचरा गोळा करायचा आणि झाडाच्या खोडाशी जाळायचा. अशा बातम्या पेपरातून  वाचण्यात आल्या. मग झाडांची कत्तल करायला सुरुवात झाली, हेतू हा असावा कि पुन्हा अपघात होऊ नये आणि खोडाशी कचरा जाळायला कोणी विरोध करू नये. काही मूर्ख लोकांच्या चुकीचे परिणाम या निष्पाप झाडांना भोगावे लागत आहेत.   

       अपघात झाला का? झाडाचे खोड जाळले आणि झाड कोसळले म्हणून. पायच जर तोडले तर माणूसही रेंगालणारच ना? हे तर झाड होत. इथे जर नियम बनवला कि झाडाच्या खोडाशी आग लावणाऱ्या व्यक्तीच्या पायालाच आग लावण्यात  येईल तर कोणी माईकालालसुद्धा झाडाजवळ काड्याची पेटी उघडणार नाही.

       पण आपल महान सरकार त्या निष्पाप, मुक्या झाडाला दोष देऊन मोकळे होणार. खरच कीव येते माणसाची.झाडांचं महत्त्व यांना कळणार कधी? 

visit my blog at www.shidori-prashu.blogspot.com

jyoti salunkhe

Yes , :) i am Completely agree with you prashant .........puranatli ek mhan he lok visruni gele aahet.............. ti mhanje vruksha valli aamha soyare... :)

प्रशांत नागरगोजे

खरंच ज्योती ....बरोबर आहे तुझं.