माणूस तो माणूस असतो रे ..!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 13, 2012, 10:07:07 AM

Previous topic - Next topic

माणसा  तू असाच रे
खोड्या  करून  सुख देतो माय - बापांना
शिक्षण  घेऊन आस  देतोस
कष्ट  करून  सोयी  पुरवतोस  आपल्यांना

मग  येतं   तरुण पण
मित्रांसोबती  धम्माल  करायचे
मित्रांसाठी  कधी जीवावर  ही
तर कधी  मनाशी खेळायचे

माणूस  तो माणूस  असतो रे ..!!

प्रेम करायचे  दिवस  येतात
शोधत असतो  त्या   सखीला
जी  आयुष्यात साथ देईल
संसार मांडुनी    जगतो आपुले

तिच्या साठी मग
काय  चंद्र  अन  काय  तारे
सारेच  कमी  पडतात  प्रेमात
मिठीत  तिला  घेऊन   जगात  असतो   तो
दुखांसोबत लढत असतो तो

माणूस  तो माणूस  असतो रे ..!!

तिच्या साठीच  तो घामातुन ही
पैश्यांचाच रास  काढतो
मग पैसे म्हणजे  सारे काही  होतं
प्रेम  ही  त्यासाठी  अपुरेच  होतं

मग तिला  प्रेम  नकोसे  वाटतं
ती म्हणते  पैसेच  हवे आहेत  मला
तुझे  तूच बघत  जा  रे
हल्ली वेळच नसतो मला

समजून  का घेत  नाही  त्यास
बैला सारखे  वागत  असतो
तुमच्यासाठी  तर  जगात असतो
दुख  कधी   त्याचे ही  डोळ्यांत  पाहून घ्या रे
तो   खरच एकटा असतो रे

माणूस  तो माणूस  असतो रे ..!!

मग  वेळ  येते  ती
शेवटची
आधार  हवा  असतो   तिचाही
आयुष्य   ते  आपले  झोकून   दुसर्यांसाठी
दिवस  असतात ते आरामाचे
सोबतीला   ती असते  नसते
माणूस आहे तो  कधी एकटे ही पडते
 
आयुष्य कधी हसवते 
अन.... 
कधी  शेवटच्या  श्वासात ही  पाणी आणते

माणूस  तो माणूस  असतो रे ..!!
नशिबात  तुझ्या त्यागच असतो रे
डोळ्यांत  पाणी  घेउनी  जगतो रे

माणूस  तो माणूस  असतो रे ..!!
-
© प्रशांत शिंदे
 



asmita!!

kavita bhaw khup changla wykt karte re. aai wadilkhup mahan astat kharach.




kavita bhaw khup changla wykt karte re. aai wadilkhup mahan astat kharach.
धन्यवाद asmita ......कविता  तर लिहली  जाते पण त्याचे अर्थ समजणे तेवढेच  महत्वाचे असतं