माणुसकी

Started by ankush.sonavane, April 13, 2012, 11:34:09 AM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

                        माणुसकी

कसं जगावं आजच्या युगात  हेच कळत नाही
जगण झाल अवघड सोपे झाले मरण.

     घरातील ज्वारी केंव्हाच  कारखान्यात गेली
     भाकरीच्या टोपलीत पावाची लादी आली
     सकाळच्या न्याहारीची जागा ब्रेकफास्ट ने  घेतली
     घरच्या लोण्यापेक्षा बटर जास्त किमती झाली.

धान्यापासून दारू बनवण्याचा कारखाना आला
म्हणे बेरोजगारांना रोजगार मिळाला
तोच पैसा दारूच्या दुकानात गेला
उपाशी पोटी जीव तडफडून मेला.

     जो तो लागला धावू पैशाच्या पाठी
     कोणी ना राहिले आता कोणासाठी
     तडफडून जातो जीव रस्त्याच्या काठी
     माणुसकी केंव्हाच मेली माणूस जागे स्वार्थासाठी.

नवरा बायकोचे ऐकू लागला
विसर आई बापाचा त्याला पडला
ज्याच्या साठी   कष्ठाने  महाल उभारला
त्यानेच त्यांना आश्रम दाखविला.

     गरीब कर्जात बुडू लागला गहाण सावकाराकडे राहिला
     मार्ग त्याला ना सुचेना जीव दोरीला टांगला
     मतलबी माणसाला त्याचा फरक ना पडला
     माणुसकी नावाचा शब्द्च पुसून टाकला .

केदार मेहेंदळे


प्रशांत नागरगोजे

  माणुसकी नावाचा शब्द्च पुसून टाकला .

vastavikata mandali ahe...chaan

jyoti salunkhe