मैत्रीण...........

Started by rajkiran.thakare, April 13, 2012, 01:06:55 PM

Previous topic - Next topic

rajkiran.thakare

मैत्रीण.....

नेह्मी तिची तक्रार असते...
मी म्हणे कधी बोलत नाही...
आणि तिच्यापुढे माझं मन...
मी कधी खोलत नाही...

तिला कितीही म्हणालो...
"तुझ्याशिवाय माझं चालत नाही..."
तिला वाटतं मस्करी करतो...
मग तिही माझ्याशी बोलत नाही...

आणि असं मुकं मुकं
आमच नात वाढत नाही...
का जाणे कुणास ठाऊक...
माझं प्रेम तिला दिसत नाही...

नशिबाने तिचा हा अबोला
फार काळ टिकत नाही...
बोलायला लागली की
शब्दांना मुकत नाही...

मान्य आहे नसतील कळत...
तिला माझ्या कविता...
माझी काळजी करणारी नजर...
तिला कशी कळत नाही

मैत्रीण गमवायची नाहीये...
म्हणुन मी बोलत नाही...
मनात नेहमी तीच असते...
म्हणुन तेही कधी खोलत नाही...

---;<@


- आनंद माने

केदार मेहेंदळे


प्रशांत नागरगोजे

जगलो आयुष्य हे मी
अन काव्य केलास तू .

आवडली आपल्याला कविता तुझी.

rajkiran.thakare

धन्यवाद मित्रानो........

PINKY BOBADE