मौन

Started by शिवाजी सांगळे, May 25, 2026, 12:26:40 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मौन

बरेच म्हणतो अडचणीत या आहे मौन माझे
दृश्य बाहेरचे विचलित करते सुख चैन माझे

गोंधळ सदृश्य स्थिती,बोकाळली सर्वत्र तेथे
काय काय पहावे?संभ्रमात पडती नैन माझे

आगडोंब सृष्टीचा न् महागाईचा रोष थोरला
सतत सर्वांसह उगाच ठेवतो मन बैचेन माझे

बाता प्रगतीच्या जाहिरातीतल्याच हो शेवटी
ऐकून वाचून सदोदित का दूर होते दैन माझे

व्यथा मनातली, कुठवर आता रोज मांडावी
बहिऱ्या यंत्रणेत इथल्या,बरे आहे मौन माझे

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९