नसतेस घरी तू जेव्हा - my fav

Started by marathi, January 24, 2009, 12:00:55 PM

Previous topic - Next topic

marathi

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !





गीत - संदीप खरे


santoshi.world


dinesh.belsare

खुपच छान... अति सुंदर. ... अप्रतिम...

aspradhan


ketan khare



मिलिंद कुंभारे


vijay bhoye

इवली इवली शी तू
लुड लुड नारे तुझे पाय
एवढ्या मोठया दप्तरात
नेतेस तरी काय...... :)

सर पूर्ण कविता हवी आहे .........