कदाचित, तिला माझं कविता करणंच नसेल आवडलं…

Started by rajkiran.thakare, April 14, 2012, 07:42:40 PM

Previous topic - Next topic

rajkiran.thakare

केवळ तिच्या एका प्रतिक्रियेसाठी
मला कविता करावसं वाटतं...
पण कदाचित, तिला माझं
कविता करणंच नसेल आवडलं...

वाचुन माझ्या कविता
ती फक्त "छान" जरी म्हणाली...
कि, काहीही न करता
हे जग जिंकल्यासारखं वाटतं...

मान्य आहे नसतील कळत
तिला माझ्या कविता, पण न कळताच ती...
"चांगली आहे" असं म्हणाली
की, मन हलकं झाल्यासारखं वाटतं...

पण, आज तिला माझी
कविता नाही आवडली वाटतं...
कदाचित, तिला माझं
कविता करणंच नसेल आवडलं...

                     -राजकीरण ठाकरे

मित्रानो, मी ही कविता तिच्यासाठी लिहिलीय.... जर तुम्हाला ह्यात काही add करावस वाटल किंवा काही suggestion असेल तर प्लिज reply करा.......

smit natekar

मृगजळ - एक नसलेले अस्तीत्व
mitra majhhi asch aahe...
Pan.......


Pradnya V Bhangale

Mitra .. aare sarv kahi sagun takayache aaste Premat.. Tuzi kavita changali aahe pan tyat tu kavita assume nako karu.. try again ..