ती पाल आज माझी मैत्रीण झाली.

Started by प्रशांत नागरगोजे, April 14, 2012, 11:58:11 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

     माझ्या रूममध्ये ट्यूब लाईटजवळ नेहमी एक पाल फिरत असते. तिला पाहून नेहमी मला खूप राग यायचा. तिथे एखादा किडा नसताना देखील ती उगाच तिथे फिरत रहायची.  मग  हातात असेल त्या वस्तूने मी तिच्यावर वार करायचो. कधी चप्पल, कधी बूट, कधी पुस्तक, वाटेल ती वस्तू तिच्यावर फेकायचो. वाटायचं एका टोल्यात ती मारावी. पण ती कधी माझ्याकडून मेली नाही आणि त्या ट्यूब लाईटजवळील जागा सोडून कधी गेली नाही. ती आत येऊ नये म्हणून मी खिडक्या, दरवाजे दिवसाच बंद करायला लागलो. आता ती बाहेर खिडकीवरूनच आत येण्याची वाट पहायची, पण तिला वाट गवसत नव्हती.

     काही दिवसांपूर्वी सांगलीत  पाऊस झाला आणि रूममध्ये पाकोळ्या, पंख असलेल्या मुंग्या, किडे यायला सुरुवात झाली. त्या दिवशी मला खूप संताप आला होता. वही हातात घेऊन मी बऱ्याच पाकोळ्या, मुंग्या मारल्या पण काही केलं तरी त्या कमी होईनात. दुसऱ्या दिवशी चुकून खिडकी उघडी राहिली. कॉलेजमधून आल्यावर पाहतो तर काय, ट्यूबलाईटजवळ  त्या किड्यांची जत्रा भरलेली. काय कराव काय  सुचेना गेलं. तेव्हा सहज त्या पालीवर नजर गेली  तर ती एक-एक करून त्या किड्यांना खात होती. मी खिडकी बंद केली आणि फक्त पंधरा मिनटात तिने सर्व किड्यांचा नायनाट केला. आणि ती पाल आज माझी मैत्रीण झाली. आता ती खिडकी मी नेहमी उघडी ठेवतो तिला आत येईपर्यंत.         


visit my blog at www.shidori-prashu.blogspot.com


प्रशांत नागरगोजे

देवयानी हि कविता नसून लेख आहे.माझ्या जीवनातील एक प्रसंग. तू वाचलास, तुला आवडला. धन्यवाद  :)