जीवन म्हणजे सागर . . .

Started by Deepak Pardhe, April 15, 2012, 01:56:32 AM

Previous topic - Next topic

Deepak Pardhe



जीवन म्हणजे एक सागर, कधी शांत तर कधी वादळ,

कधी नशिबाने भरभरलेली, तर कधी फ़क्त अपेक्षांनी भरलेली घागर,

कुणाच्या सुखाला कधी कोण वाटेकरी, तर कुणा एका बरोबर फ़क्त दु:खाची चादर,

सागराला कित्येक नद्यांची जोड़ मिळते,

काही सोबतच राहतात, तर काहिना नविन वाट फूटते,

कधी उंच लाट बनत स्वप्नांना कवेत घेण्याची हौस असते,

तर कधी ओहोटी बनुन तुटलेल्या स्वप्नांची रास असते,

सागरात इच्छा आकांक्षाच्या बेटांची रीघ असते,

तर ते पूर्ण करण्यासाठी सुरु असलेली शर्यत असते,

या सागरात सगळ्यांना सामावून घेण्याची ताकत असते,

तर कधी कोणाला तारन्याची वा मारण्याची देखिल शक्ति असते,

अशा या सागराला माणुसकीची जोड़ असावी,

स्वत: साठी खारट तर दुसर्यांसाठी नेहमी गोडी असावी,

देवा माझ्या जीवनरूपी सागराला तुझ्या आशिर्वादाची नदी मिळावी,

शरीररूपी या देहामधे इतरांसाठी माणुसकी आणि भावना सतत जिवंत रहावी . . .


-  दीपक पारधे 


(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या blogs ना जरुर भेट दया  : deepakpardhe.blogspot.in
अथ
वा
फेसबुकवर माझे पेज like करा : माझे शब्द आणि लपलेल्या भावना  )

केदार मेहेंदळे


Deepak Pardhe



Deepak Pardhe




Deepak Pardhe


balrambhosle


Deepak Pardhe