अपेक्षा आहे मला परिवर्तनाची

Started by प्रशांत नागरगोजे, April 15, 2012, 09:56:35 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

जळू लागलीत रोपं संस्कारांची
वाट पाहतो,
पुन्हा टवटवीत हिरवळ उमलण्याची.
अपेक्षा आहे मला परिवर्तनाची.

नाती आहेत खूप इथे जगणाऱ्यांची
वाट पाहतो,
नात्यांत प्रेम जपणाऱ्यांची.
अपेक्षा आहे मला परिवर्तनाची.

आहे इथे गर्दी खूप देखाव्यांची 
वाट पाहतो,
मदतीला धावणाऱ्या पावलांची.
अपेक्षा आहे मला परिवर्तनाची.

संख्या खूप आहे, भूमातेला लोचनार्यांची 
वाट पाहतो,
तिला सांभाळणाऱ्या वीरांची.
अपेक्षा आहे मला परिवर्तनाची

धर्मांचा इथे ढीग लागलाय
वाट पाहतो,
मानवता धर्म शिकवणाऱ्याची.
अपेक्षा आहे मला परिवर्तनाची.

नजरा इथे बाटत  चालल्यात
वाट पाहतो,
स्त्रीला सन्मान देणाऱ्या नजरेची.
अपेक्षा आहे मला परिवर्तनाची.

बरीच आहे गणती आता वृद्धाश्रमाची
वाट पाहतो,
आईबापाला सांभाळणाऱ्या श्रावणबाळाची.
अपेक्षा आहे मला परिवर्तनाची.

शिवबाचा बाणा ओठांवरच  फडकतो आता
वाट पाहतो,
हिंदवी स्वराज्य रथारूढ करणाऱ्या मनाची
अपेक्षा आहे मला परिवर्तनाची .



visit my blog at www.prashu-mypoems.blogspot.com

केदार मेहेंदळे