प्रिया आज माझी नसे त्रास द्याया

Started by केदार मेहेंदळे, April 16, 2012, 12:28:25 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

(श्री सुधीर फडके आणि कवी यशवंत देव यांची माफी मागून तसेच सर्व रसिक, कवी अन गायक यांची माफी मागून "प्रिया आज माझी नसे साथ द्याया" ह्या गाण्यावर/ कवितेवर विडंबन कविता पोस्ट करत आहे. ह्यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसून निखळ करमणूक हाच उद्देश आहे. तरी कोणाच्या भावना  दुखावल्या  असल्यास    क्षमस्व)

नायकाची प्रिया काही दिवसा करीता माहेरी गेलेली आहे. त्या दिवसात नायकाच्या भावना कवितेतून व्यक्त केल्या आहेत.
   

प्रिया आज माझी नसे त्रास द्याया
आणा जीन व्हिस्की, आणा दाणे चखणा
प्रिया आज माझी नसे त्रास द्याया

नको रे  मना आज भिऊ जराही
पिण्यासी तुला आज बंदीच नाही
न पीशि तरी रात जाईल वाया
प्रिया आज माझी नसे त्रास द्याया

आणुनी मित्राना पिऊ रोज दारू
घरी नाही कोणी बिड्या पाच ओढू
कुणाला कळाव्या कथा या सुखाच्या
प्रिया आज माझी नसे त्रास द्याया

प्रिया आज माझी नसे त्रास द्याया
नको केर वारे कराहि पसारा
प्रिया आज माझी नसे त्रास द्याया

न भिती जीवाला, न कामांचा त्रास
बघू द्या मला आज टीव्ही निवांत
आता ना प्रियेचे मी दाबीन पाया
प्रिया आज माझी नसे त्रास द्याया

आता झोपण्याला अशा मस्त राती
कानाशी आता नाही घोरणार कोणी
नसे ती छळाया जुनी महामाया
प्रिया आज माझी नसे त्रास द्याया


केदार...

प्रिया माहेरून परत आल्यावर नायकाला काय वाटत. पुढल्या सोमवारी (दि. २३/०४/२०१२)  "प्रिया आज माझी असे त्रास द्याया"  जरूर वाचा.
माझी दुसरी विडंबन कविता.
  प्रिया आज माझी असे त्रास द्याया
http://marathikavita.co.in/index.php/topic,8327.0.html



rushikesh jadhav

khup mast khup tras dete watat........................................................