चुकीत मजा

Started by शिवाजी सांगळे, May 30, 2026, 03:57:30 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चुकीत मजा

किती म्हणून सांगू मी माझ्या चुका
करण्या त्या गवसतोच मला मौका

सहज बोलणे, बोलतो जरी एरव्ही
लिहिण्या सुचते शब्दांची मालिका

कसली जादूगरी हि काही कळेना
स्पर्श या नव रसांचा कळतोय का

चुकांमधून उमटती भाव वेगवेगळे
कंगोरे भावनांचे ह्या उमगतात का

काही आपसूक,होती मुद्दाम काही
हं,करण्या चुका, मजा येते बरं का

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९