चैत्र - वैभव ("निसर्गकविता")

Started by shashaank, April 18, 2012, 09:09:20 AM

Previous topic - Next topic

shashaank

चैत्र - वैभव

ही उजाड दिसती राने भूमीही चिराळलेली
चैत्राची येता साद झाडे ही पालवलेली

निष्पर्ण रानातून ही गुलमोहर फुलारलेला
सोनसळ लेऊन अंगी बहावा रसरसलेला

स्वागत या ऋतुराजाचे होतसे पक्षीगणात
कोकिळ तो उच्चरवाने साद घाली पंचमात

तिन्हीसांजा टाकी मोहून मोगरा शुभ्र कळ्यांचा
कृष्णवस्त्री शोभे कशिदा गंधितसा काय हिर्‍यांचा

चैत्रवेल राती दिसते आकाशी बहारलेली
चांदण्यातून ओघळलेली शीतलता दयाघनाची

-shashaank purandare.

केदार मेहेंदळे