अपेक्षांची थप्पी

Started by vaibhav joshi, April 18, 2012, 11:25:08 AM

Previous topic - Next topic

vaibhav joshi

अपेक्षांची थप्पी...

एक असते अपेक्षांची थप्पी
एक असतो अपेक्षांचा ढीग
एक अपेक्षा ठेवली की मग थर साचत  जातात भराभर...
जसा थर  'साचत' जातो तसाच तो बओचत जातो
कारण हेच , की 'भार' वाढला असता 'दबाव' वाढत जातो
भल्या मोठ्या या ढीगासमोर कर्त्याचेच व्यक्तिमत्व 'खुजे' होते
ज्या गाढवाने यांचा  ढीग रचला त्याच्याच पाठीवर 'ओझे' होते
एवढे मात्र खरे की, काही अपेक्षांची होते वाफ
तर काही राहतात
जखमेच्या व्रणआ सारख्या चुपचाप
कधी कधी वाटते या गाढवाला, की घोड्यासारखे स्वैर मुक्त पळत सुटावे
पण अपेक्षांचे 'गुरुत्वाकर्षण' सुटू देत नाही हे त्याला कसे पटावे ?

-- वैभव वसंत जोशी, अकोला

MK ADMIN

krupaya title suddha marathi madhye taka... me posts edit keli ahe. Enjoy MK :)

केदार मेहेंदळे



muktibodh