अशा या सांजवेळी

Started by Dr.Vinay Kalikar, April 18, 2012, 01:47:14 PM

Previous topic - Next topic

Dr.Vinay Kalikar

अशा या सांजवेळी

अशा या सांजवेळी
सखे ये ना जवळी
येई भास अवेळी
मनास वेळोवेळी
प्रीतीत, मिठीत
प्रिये ये ना समोरी .

अशा या सांजवेळी
सखे ये ना जवळी .

हि गुलाबी हवा
प्रीतीची हि नशा
झालो वेडा पिसा
आठवाने तुझ्या
मस्तीत, धुंदीत
ये ना ये ना जवळी .
अशा या सांजवेळी ........

चाहुल हि ती कशी
गंध आला कसा
स्पर्श कोण तुझा
छळवाद का असा ?
लपून ,छपून
ये ना ये ना जवळी .
अशा या सांजवेळी........

___विनय काळीकर ___
२६-०३-१२.९३२५३०९६१७ .
___नागपूर__________



केदार मेहेंदळे