धुंद प्रीतीची रात

Started by Dr.Vinay Kalikar, April 18, 2012, 01:55:18 PM

Previous topic - Next topic

Dr.Vinay Kalikar

धुंद प्रीतीची रात

धुंद प्रीतीची रात
दे ना मला साथ
जाऊ नकोस दूर
होऊ एक सूर
मी तुझा, साजणी
घे, ना मिठीत ग .

धुंद प्रीतीची रात
दे ना मला साथ .

अंग गोरे तुझे
यौवन मखमली
लोचनात नशा
मदहोश साजणी
ओढ ना ,जवळी
एक होऊ सखे .
धुंद प्रीतीची रात ..........

तप्त ओठात ग
ओठ हे गुंतले
श्वास श्वासात ग
असे कसे गुंफले
प्रीतीत डुंबलो
चिंब होऊ प्रिये
धुंद प्रीतीची रात ........

___dr. विनय काळीकर ___
18-04-12;9325309617. 
____नागपूर ___________

केदार मेहेंदळे


jyoti salunkhe