कवितेची एक ओळ

Started by Dr.Vinay Kalikar, April 18, 2012, 08:34:12 PM

Previous topic - Next topic

Dr.Vinay Kalikar


कवितेची एक ओळ



मिळे ना मिळे ना

ए मना शोधना

शिंपल्यात,तळाशी तुझ्या

निळ्यात ,नभाशी तुझ्या

कप्प्या कप्प्यात तुझ्या

कवितेची एक ओळ ...



डोंगर माथ्यावरी

कडे -कपारीतुनी

वाऱ्याच्या झोक्यावारी

निर्झर झऱ्यातुनी

पानाफुलातुनहि न मिळे

कवितेची एक ओळ ...



विचार ,माहेरवाशिणीला

वादळातील घायाळ तरुला

विरहात फिरणाऱ्या धरेला

कवितेची एक ओळ ...



कुठेच नाही मिळणार

शोधून नाही सापडणार

अशीच नाही गवसणार

कवितेची एक ओळ ...



छेडता मनाची तार

करेल हृदय एल्गार

नव्या कल्पनेलाच मिळणार

कवितेची एक ओळ. ...



__विनय काळीकर --

केदार मेहेंदळे