मिणमिणते दिवे

Started by muktibodh, April 19, 2012, 08:16:06 AM

Previous topic - Next topic

muktibodh

मिणमिणते दिवे
आता थोडेच उरलेत,
तेही विझतील
लवकरच!
त्याचे आयुष्यच तेवढे
त्याला कोण काय करणार?

कोणीच थांबत नाहीत,
दिव्यात तेल घालण्यास
वातीला समोर सरकावुन,
काजळी झटकण्यास!

नव्या दिव्यांची चोहीकडे
आरास!
रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट
झुंबरांच्या बेल्लोरातुन
चकाकणारा प्रकाश!

आता सवाल
दिव्यातुन मिळणार्‍या,
प्रकाशाचा नाही
तर प्रकाशाने
चमचमणार्‍या झुंबराचा आहे!

प्रदीप मुक्तिबोध

balrambhosle


vaibhav joshi

खरच छान कविता आहे तुमची.  इतका बारकाईने आणि सूक्ष्म विचार , खरच छान
अभिनंदन !

केदार मेहेंदळे


amit SHIDURKAR