घे विसावा जरा

Started by Dr.Vinay Kalikar, April 19, 2012, 08:03:48 PM

Previous topic - Next topic

Dr.Vinay Kalikar

धाव धाव तू थकला का रे
अर्ध्यात रस्ता चुकला का रे
गोंधळात तू पडला का रे
मना! घे विसावा जरा .

रस्ते हजार सभोवताली
दिशा लक्ष तुझ्या सभोवती
मार्ग कोणता तू मिळवीशी
मना ! घे विसावा जरा .

कसे तुज समजाऊ सांग रे
तुझे स्वरूप चंचल आगळे
क्षणात इथे ,तर क्षणात तीथे रे
मना! घे विसावा जरा .

दिशा असावी सन्मार्गाची
मोक्ष, मिळण्या ईश्वरप्राप्ती
जाऊन शरणी , त्याच्या चरणी
मना! घे तिथे विसावा जरा.

___विनय काळीकर ___


केदार मेहेंदळे