माझ हृदय ठेवलं मी गहान.........

Started by balrambhosle, April 19, 2012, 11:11:20 PM

Previous topic - Next topic

balrambhosle

माझ हृदय ठेवलं मी गहान.........
आठवतंय का प्रिये तुझ्याच कडे मी हृदय ठेवल गहान..
पण प्रिये तुला त्याच थोड पण नाही भान..
हृदया शोधात मी कुठे कुठे फिरू ..
आणखी किती दिवस मी हि वेडी आस धरू..
ये न ग प्रिये फक्त एकदाची ये न..
आणि माझ्या बाहू मध्ये बुडून जा न..
तू सोडून गेलीस अशी मला..
जस मी भेटलोच नव्हतो तुला..
तू म्हटलं तसच तर केल होत मी..
आणि त्यात पण काय चुकलो होतो मी..
खरच ग मी नाही बोललो कुणाला..
आणखी किती वेळा सांगू ग हे तुला..
माझी एकुलती एकंच आणि लाडकी प्रेयसी तू..
जिच्यावर मी जीवापाड प्रेम केल अशी पण एकंच तू.
तू उगाच संशय करतेस माझ्यावर..
तुला कस सांगू मी फक्त मारतो तुझ्यावर
आज तू इथे नाहीस तर जीव नाही अस वाटतंय .
आणि ह्या रात्रीचा अंधारच  भय मनात दाटतय
प्रत्येक क्षण मला सुई सारखा टोचतोय..
तरीपण ह्या वेदना मी मेंदूत सहन करतोय..
आणि हृदया पासून अडवतोय..
कारण माझ हृदय तुझ्याजवळ आहे..
आणि ते तुला थोडा पण त्रास देणार नाही..
आणि जर का तसं झाल न....
तू त्याला सुऱ्याने चिरून टाक..
मग त्याच्याकड बघू पण नको..
तू आणखी नाही समजल ग माझ प्रेम..
खरच तू खूप भोळी आहेस..
आणि म्हणूनच मला आवडतेस..
शेवटी फक्त एव्हडाच म्हणायचं मला..
मी तुझ्या शिवाय कधीच जिवंत राहू शकत नव्हतो ..
हृदया विना माझ्या जिवा ने देहाचा त्याग केला
आणि आता मी स्वर्गात आहे..कारण माझ प्रेम खर होत..
जे कि तुला कधीच समजल नव्हत ..
आणि जर का माझी आठवण आली तर माझ्या मृत देहावर
एकदा तुझा हात जरून फिरवून जा प्रिये..
माझ्या मृतदेहाला पण तुझा स्पर्श जाणवेल..

---बळीराम भोसले

Guari


asmita!!

khup khup dukh ahe re kavitet...pan kahi thikani chuka ahet tya durust kar..nahi tar kavitecha arth badlun jatoy