"एक छोटेसे प्रश्नचिन्ह????"

Started by vaibhav joshi, April 20, 2012, 02:11:26 PM

Previous topic - Next topic

vaibhav joshi

एक छोटेसे प्रश्नचिन्ह...
चुकीची निवड की निवडीची चूक?
माणसाला निवडीचे स्वातंत्र्य असते
पण एकदा निवडल्यावर स्वातंत्र्य टिकून राहते ?
निवडणे म्हणजेच 'अवलंबणे' अन अवलंबून असणे म्हणजेच पारतंत्र्य!
एकदाची निवड झाली की ती 'रिकामी' होते
अन तिची जागा दुसरी एखादी 'निवड' घेते 
मग पुन्हा अवलंबित्व, पुन्हा पारतंत्र्य
अपेक्षांचा, इच्छांचा गोतावळा वाढत जातो
मग सगळा चोथा, गुंता अन कोळ्याचे (की काळाचे?) जाळे !
या कोळ्याच्या जाळ्यात, कोळीष्टकात परत तेच फसलेले सापडते...

"एक छोटेसे प्रश्नचिन्ह???"

        ---वैभव वसंत जोशी, अकोला



केदार मेहेंदळे

khup chan...

nivad nikad kadhi bante te kalat nahi ani mag aprihary pane he ase hote. nahi ka?