आई माझी आई (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, April 20, 2012, 02:16:06 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore


आई माझी आई

आई माझी आई

तुझ्या सारखी कोणीच नाही
आई माझी आई
तुझ्या सारखी कोणीच नाही

जेंव्हा मला तुझी आठवण येते
तुला भेटण्याची ओढ लागते
तू तयार केलेले पोहे आठवताच
मला गं आई भूक लागते

जवळ तू माझ्या नसतांना
काळजी कोणी घेऊ शकत नाही

आई माझी आई
तुझ्या सारखी कोणीच नाही
आई माझी आई
तुझ्या सारखी कोणीच नाही

तुझं रागावणं, तुझं मारणं,
मारल्यावर प्रेमानं बोलावणं
दोन लाथा मी जास्त घातल्या
हे जवळ घेऊन हसून मलाच सांगणं

असल्या स्वभावाचं दर्शन
आता मला कधीच होत नाही

आई माझी आई
तुझ्या सारखी कोणीच नाही
आई माझी आई
तुझ्या सारखी कोणीच नाही

संकटात सापडल्यावर
मनुष्य प्राणी त्रासून जाई
देव नसे प्रत्येक ठिकाणी
म्हणून बनवली त्याने आई

तिच्या सहवासाशिवाय
जीवन म्हणजे जीवन नाही

आई माझी आई
तुझ्या सारखी कोणीच नाही
आई माझी आई
तुझ्या सारखी कोणीच नाही

कवी - कल्पेश देवरे 


केदार मेहेंदळे


sanjiv_n007

deval pratyekachya ghari jata aale nahi mahnun,,, tyane aaila pathvile...


balrambhosle

 :) :) :) असली कविता वाच्लीना पापण्यात पाणीच येत रे..चार महिने झाले मी घरापासून दूर आहे..खरच छान रे....आता परत जाणार आहे परीक्षा संपल्यावर..आणि आईला हि कविता जरूर दाखवणार..

Kalpesh Deore

मला खुपच छान वाटत आहे.......तुझ्या सारखाच मीही माझ्या आई पासून फार दूर आहे....... इराक़ मध्ये काम करतोय....धन्यवाद माझी कविता आवडल्या बद्दल....


Santosh Awachar

Great bhawa hat's up 👆 आई शप्पत पानी आलंय डोळ्यात😢