हल्ली मी...

Started by vaibhav joshi, April 20, 2012, 02:47:36 PM

Previous topic - Next topic

vaibhav joshi

हल्ली मी...

हल्ली मी मनाचे गहीरंग शोधतोय...
मन: पटलावरच्या इच्छा, पडसाद यांचा मागोवा घेतोय...
हल्ली मी मनाचे गहीरंग शोधतोय...

हल्ली मी फारच एककल्ली झालोय
विचारांच्या जाळ्यातला एक कीटक झालोय
हे जाळे ज्याने विणले ''त्या'' कोळ्याची वाट बघतोय
हल्ली मी मनाचे गहीरंग शोधतोय...

माझे मन, मनातले विचार, विचारान्मधले प्रश्न
अन या प्रश्नांचा थांग लागतो का हे बघतोय
हल्ली मी मनाचे गहीरंग शोधतोय...

गहीरंग शोधताना मला जाणवले की मनात आहेत
तीनही ज्वालामुखी जागृत, सुप्त, निद्रिस्त
आपल्या उद्रेकाबरोबर ते "आजूबाजूच्या" परिसरावर आग ओकतात
मात्र हेही तेवढेच खरे की, या 'लाव्ह्याबरोबरच'
'लाह्यांसारखा' सुपीक गाळही ते बाहेर फेकतात !

--- वैभव वसंत जोशी, अकोला   

केदार मेहेंदळे