तुझ्या-माझ्यात

Started by Dr.Vinay Kalikar, April 20, 2012, 08:10:24 PM

Previous topic - Next topic

Dr.Vinay Kalikar

तुझ्या-माझ्यात सखे
कसे पडले पाश ग SS
जखडलो असे एकमेकात
दोन जीव, एक श्वास ग SS

मतभेद होताच
वादळ उठते मनात ग SS
हेवे -दावे पडती थिटे
प्रीती तुझी अफाट ग SS

जन्मोजन्मीचे हे नाते
भासे रोज नवीन ग SS
तोच मी अन तीच तू
ओढ कशी हि अवीट ग SS

---विनय कालीकर ----

केदार मेहेंदळे