निरोप

Started by प्रशांत नागरगोजे, April 20, 2012, 11:41:13 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

तू नक्की येशील बरं,
मला निरोप द्यायला.
माझ्या निपचित देहावर,
दोन सुगंधी फुले वाहायला.

(तुला काय? तू वाहशील दोन फुले)

पण तूच सांग, जाणवेल कसा,
सुगंध मला त्या फुलांचा?
निपचित पडलेला तेव्हा मी,
खरतरं नसेल या देहाचा.

तरी तू जवळ ये,
देहाला हात जोडण्याच्या नादानं.
बघशील चेहऱ्याकडे माझ्या,
दिसेल तुला हसू...

तू विचार करशीलच,
"मी हे काय बघतेय ,
मी बेवफाई केली असता,
तो अजून हसतोय. "

हो..हो मी हसलो ...मौनापुर्वी.
कारण...कारण मला माहित होतं,
तू येशील एकदा,
देह माझा जळण्यापूर्वी.

जाताजाता बेवफा सखे,
डोळ्यांत माझ्या पाहून  जा.

ठेवलेले जपवून पापण्यांनी
अश्रू दोन शोधून जा.
त्या अश्रूंत  चेहरा तुझा,
जाताना पाहून जा.

मी प्रवासी तुझ्या प्रेमाचा,
रात्रीच्या आभाळात जाणार.
आता पहिल तिथून तुला,
निरोप मला देऊन जा.
निरोप मला देऊन जा.

Visit my blog at www.prashu-mypoems.blogspot.com

PINKY BOBADE

So Sad........................

jyoti salunkhe

Very Heart Touching Poem  :) Specially this Following Lines

ठेवलेले जपवून पापण्यांनी
अश्रू दोन शोधून जा.
त्या अश्रूंत  चेहरा तुझा,
जाताना पाहून जा.

मी प्रवासी तुझ्या प्रेमाचा,
रात्रीच्या आभाळात जाणार.
आता पहिल तिथून तुला,
निरोप मला देऊन जा.
निरोप मला देऊन जा.