हळूहळू संथपणे बदल निश्चित होत आहे!

Started by muktibodh, April 21, 2012, 08:45:18 AM

Previous topic - Next topic

muktibodh

पायांवरुन पायडलवर,
पायडलवरुन किकवर
किकवरुन ईग्निशनवर
माझा विकास होत आहे.
हळूहळू संथपणे बदल निश्चित होत आहे!

भोगलेले शब्द आता,
चोथा होऊन फिरत आहेत
मनामध्ये जपलेले विचार
रोज आता मरत आहेत.
हळूहळू संथपणे बदल निश्चित होत आहे!

काल पर्यन्त नाकारलेले,
आता मला पटत आहे
हळूहळू मी देखिल
त्यांच्या सारखाच होत आहे.
हळूहळू संथपणे बदल निश्चित होत आहे!

दुख:, दैन्य, दारिद्रयाचा,
आता फ़क्त राग आहे
माझ्यापुरति ही समस्या
मी आधीच सोडवलेली आहे.
हळूहळू संथपणे बदल निश्चित होत आहे!

तरी देखिल का कळेना
काळजामध्ये कळ येते,
खोल कुठे चुकल्याची
सतत, सतत जाणिव होते.
हळूहळू संथपणे बदल निश्चित होत आहे!

प्रदीप मुक्तिबोध


केदार मेहेंदळे