पाऊस आला...

Started by shashaank, April 21, 2012, 04:51:25 PM

Previous topic - Next topic

shashaank

पाऊस आला...

धाड धाड धूम... धाड धाड धूम
पाऊस आला.....भरुन भरुन...

लख लख लख.... वीज चकमक
आवाज मोठा....गुडूड..गुडूम..

थाड थाड थाड... गारा गारेगार
खाऊ या मस्त...कुडुम कुडुम..

टप टप टप...थेंब टपोरे
ओंजळीत घेऊ...भरुन भरुन..

पावसाचे पाणी...पावसात गाणी
नाचू खेळू...उड्या मारून..

चला चला सारे...घरात या रे या रे
चहा आल्याचा...प्या ऊन ऊन..



-shashaank purandare

केदार मेहेंदळे