कधी सुटेल हे ग्रहण

Started by muktibodh, April 22, 2012, 09:20:13 AM

Previous topic - Next topic

muktibodh

का अजुन तडफडतोय
अन्नासाठी जीव,
का अजुन तॄषार्त आहे
पाण्यासाठी जीव,
का अजुन कष्टाला
मिळत नाही मोल
का अजुन दुखा:ने
तळमळ्ते हे मन!
कधी तुटेल हा चक्रव्युह
कधी सुटेल हे ग्रहण
कधी येतील ओठांमधुन
तॄप्तीचे स्वर!

प्रदीप मुक्तिबोध

केदार मेहेंदळे