आपण आपल्याच आयुष्याला परके होतो.

Started by हर्षद कुंभार, April 22, 2012, 11:59:29 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

किती हतबल होतो ना आपण ...

अचानक तिने प्रेम करणे बंद केले की,
जसे काही एकदम प्राणवायू
हिरावून घ्यावा.


किती झगडतो ना ...
एक अंश तिच्या प्रेमाचा मिळवायला,
का होते असे...
आधीचे स्वच्छंदी आयुष्य सोडून,
आपण आपल्याच आयुष्याला परके होतो. - हर्षद कुंभार ( फेसबुकचा कवी म्हणत्यात मला)