स्वप्ने!

Started by muktibodh, April 24, 2012, 08:51:54 AM

Previous topic - Next topic

muktibodh


स्वप्ने!
तुही पाहिली असशील,
वैभव संपन्न आयुष्याची!
तुझ्याकरीता कठीण नव्हते
चार चौघींसारखे जगणे !

सावित्रीच्या आडव्या कुंकवासारखे,
तुझ्या भाळीचे लखलखणारे धर्मबिंदु,
आजही स्पष्ट दिसताहेत!

रस्त्या रस्त्यांवरुन  धावणारे तुझे पाय,
आवळ्लेल्या मुठी,
आणि आक्रोशाची धार,
आजही स्पष्ट दिसत आहे!

पिळवटलेल्या स्त्रिया
श्रमिकांमध्ये,
निर्भयपणे,वावरणारी
तुझी मोहक मुर्ती,
ढळत नाही डोळ्यापुढुन आजही!

क्रुर सत्तेने  अनेक वेळा
रक्तबंबाळ केले तुला,
तुरुंगाच्या गजाआड
कित्तेकदा भिरकावले!

तरी तु चवताळ्लेल्या
वाघीणीसारखी,
फिरुन फिरून हल्ला करणारी
अन्यायाच्या विरोधात
पुन्हा पुन्हा लढणारी!

फार थोडे असतात,
तुझ्यासारखे लढणारे
सर्व काही भिरकावुन
भव्य स्वप्नांना कवटाळणारे!


प्रदीप मुक्तिबोध

केदार मेहेंदळे