असतात काही नाती अशी

Started by jyoti salunkhe, April 25, 2012, 11:17:02 AM

Previous topic - Next topic

jyoti salunkhe

असतात काही नाती अशी
शब्दात कधी न सांगता येणारी

असतात काही नाती अशी
कळून सुधा कधी न कळणारी

असतात काही नाती अशी
फुल सुकल्यावर हि सुगंध सोडून जाणारी

असतात काही नाती अशी
न विसरता आठवणीत राहणारी

असतात काही नाती अशी
अमृता सारखा गोडवा जपणारी

असतात काही नाती अशी
दुख विसरुनी प्रेम शिकवणारी

.........................ज्योती साळुंखे